‘भाजपच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची टीका शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला संजय राऊतांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलय. शरद पवार हे छोटे नेते आहेत, अशी खरपूस टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
पत्रकारांसोबत बोलताना संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांचा मानसिक संतुलन बिघडले असल्याचं म्हटलं आहे. पत्रकारांनी संजय राऊतांना विचारलं की चंद्रकांत पाटील म्हणताहेत की शरद पवार छोटे नेते आहेत. यावर तुमची प्रतिक्रिया काय? यावर संजय राऊत म्हणाले की शरद पवारांच्या उत्तुंग राजकारणाची जाणीव चंद्रकांत पाटलांना नाही.
देशाच्या पंतप्रधानांनी देखील आपण शरद पवारांचे मार्गदर्शन घेत असल्याचे कितीतरी वेळा म्हटलं आहे. मात्र या गोष्टींची माहिती चंद्रकांत पाटलांना नसावी, असं देखील संजय राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांविषयी केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली असून तुम्ही आम्हाला चंपा म्हणता ते कसं चालतं असा प्रश्न लोकांना केला आहे.
महत्वाच्या बातम्या – पहाटेच्या शपतविधीची वर्षपूर्ती…
पवारांवर केलेल्या टिकेबद्दल चंद्रकांत पाटलांनी मागितली माफी!