सध्या दैनंदिन जीवनात व्हाट्सअपचा वापर प्रचंड वाढला आहे. चॅटिंग करणं फोटोज् शेअर करणं यासारख्या कामासाठी याचा मोठा वापर होतोय. पण चॅटिंग केल्यानंतर काही वेळेत आपोआप मेसेजेस डिलीट व्हावेत, असं अनेक जणांना वाटतं. व्हाट्सअपने हे नवं फिचर आता लोकांसाठी उपलब्ध केलं आहे.
व्हाट्सअपची ‘डिसअॅपेरींग मेसेजेस’ सुविधा चॅटिंग जास्तीत जास्त वैयक्तिक राहावी, यासाठी सुरू केली आहे. ही सुविधा चालू केल्यावर सात दिवसानंतर तुम्ही केलेली व्हाट्सअप चॅट आपोआप डिलीट होते. पण जर समोरच्या व्यक्तीने चॅटिंगचे स्क्रीनशॉट काढले तर याचा काही उपयोग होणार नाही.
‘डिसअॅपेरींग मेसेजेस’ पर्याय सुरू कसा करायचा?
तुम्हाला व्हाट्सअपचं लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावं लागेल.
चॅटिंगमध्ये जाऊन ज्या व्यक्तीसाठी Disappearing messages हा पर्याय सुरू करायचा आहे, त्याच्या नावावर क्लिक करा.
तुम्हाला Disappearing messages नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Disappearing messages पर्याय On करायचा आहे.
हा पर्याय चालू केल्यावर सात दिवसानंतर तुम्ही केलेली सगळी चॅटिंग आपोआप डिलीट होईल.
जर तुम्हाला एखादा फोटो किंवा व्हिडीओ आला आणि Auto download पर्याय चालू असेल तर फोटो किंवा व्हिडिओ फोनमध्येच सेव्ह राहतील.
अशा प्रकारे तुम्ही तुमची चॅटिंग जास्तीत जास्त वैयक्तिक ठेवू शकता.