राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सौर ऊर्जा आणि इथेनॉल निर्मितीतील कामाबद्दल कौतुक केले आहे. मात्र त्याचवेळी कोरोनामुळे राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजपा नेत्यांवरही रोहित पवार यांनी टीका केल्या आहेत.
रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सौर ऊर्जा आणि इथेनॉल निर्मिती क्षेत्रामध्ये झालेल्या कामाचे कौतुक करायला हवं. त्यासोबतच रोहित पवार यांनी वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काम व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तसंच कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन मोदीजींनी #G20Summit परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला.त्यांनी या संकटाची जाणीव भाजपच्या राज्यातील नेत्यांनाही करुन दिली तर ते या संकटाचा राजकीय खेळ थांबवतील pic.twitter.com/qVKZikUKpJ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 22, 2020
यासोबत दुसरे ट्विट करत ते म्हणाले, “कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी जी २० परिषदेत जागतिक नेत्यांना केले होते.”
महत्वाच्या बातम्या – वीज दरवाढी विरोधात मनसे मोर्चा काढणार!
शाळेची घंटा फक्त ग्रामीण भागातच वाजणार…
आयबीपीएसच्या 600 हून अधिक रिक्त जागांसाठी मेगा भरती! जाणून घ्या पूर्ण माहिती
रस्त्यातच आपला “हिरा” गमावलेल्या शेतकऱ्याला सोशल मिडीयावरुन युवकांच्या मदतीचा हात!