‘जय हो’, ‘वजहा तुम हो’ या सिनेमात अभिनय करणारी तसेच आपल्या बोल्ड अंदाजनं चर्चित असणारी अभिनेत्री सना खान हिने अभिनय आणि ग्लॅमर क्षेत्रातून एक्झिट घेतली. मरणानंतर सुध्दा आपलं जीवन चांगलं व्हावं यासाठी तिने हा निर्णय घेतला. अल्लाने आपल्याला जन्माला घातलं आहे. त्यामुळे अभिनय आणि ग्लॅमर क्षेत्रातून तिने एक्झिट घेतली. यामुळे ती चांगलीच चर्चित राहिली होती. मात्र पुन्हा एकदा सना खान चर्चेत आली आहे, ते तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे.
सनाने २० नोव्हेंबरला सुरतमध्ये मौलाना मुक्ती अनस यांच्याशी निकाह केला. निकाह केलेला फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. एकमेकांवर प्रेम केले अल्लासाठी… एकमेकांसोबत निकाह केला अल्लासाठी…. या जन्मात अल्लाचा आशीर्वाद आम्हाला एकत्र ठेवेल आणि स्वर्गात पुन्हा आम्ही एकमेकांना भेटू… असं या फोटोसोबत सनाने लिहिल आहे. यामुळे निकाहची बातमी ऐकून प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या आधीही सनाने असाच अचानक इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. “मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाच्या मार्गाचे अनुसरून करण्यासाठी ग्लॅमर दुनिया सोडत आहे” असं तिनं जाहीर केलं होतं. सनाने निकाहचा फोटो शेअर करण्याअगोदर काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
२००५ मध्ये ‘यही हे हाय सोसायटी’ या सिनेमातून सनाने अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. बिग बॉस ६ ची सेकंड रनरअप सना होती. हिंदी, मल्याळम, तमिळ तेलुगू, कन्नड या भाषांतही तिने सिनेमे केले आहेत.
वाचा – आता दोन दिवसांसाठी वापर मोफत नेटफ्लिक्स; कधी, कुठं, कसं जाणून घ्या सर्वकाही