सोमवार पासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला असला तरी फक्त ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार आज ग्रामीण भागातील 35 टक्के शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र शाळेत केवळ पाच टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.
लॉकडाऊन नंतर अखेर आज राज्यातील काही जिल्ह्यांमधील सुमारे 35 टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. मात्र त्यानंतर कोरोणाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीमूळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने सरकारने शाळा सुरू करण्याबद्दलचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवला.
शाळा सुरु झाल्या नंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पहिल्या दिवसाच्या घेतलेल्या आढाव्या वरून एक दिवस आड शाळा केल्यास विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गही चालू राहणार आहेत अशी माहिती दिली.
राज्य सरकारच्या निर्णयानंतरही जळगाव, ठाणे, धुळे, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी पालघर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड मुंबई आणि हिंगोली या जिल्ह्यातील शाळा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 31 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर राज्यातील सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नागपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, अकोला, गडचिरोली, नगर, रायगड, सांगली, पुणे जिल्हा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, अमरावती, सिंधुदुर्ग, वर्धा, नंदुरबार या जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान शिक्षण विभागाच्या माहितीनुसार ३५ जिल्ह्यांच्या २५ हजार ८६६ शाळांपैकी ९ हजार १२७ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यातील 2 लाख ७५ हजार ४७० शिक्षकापैकी १ लाख ४१ हजार ७२० शिक्षकांची चाचणी पूर्ण झाली असून त्यातील १हजार ३५३ शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला आहे. तसेच ४४ हजार ३१३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी २९० कर्मचाऱ्यांचे कोराळा चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय’
पहाटेच्या शपतविधीची वर्षपूर्ती…