“पुढील दोन तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल” या केंद्रीय मंत्री व भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रावसाहेब दानवेंना चांगलेच सुनावले आहे.
“हे सरकार चार वर्ष पूर्ण करेल. एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि चार वर्ष पूर्ण करेल. निराश झाल्याने तसंच सर्व प्रयत्न फसल्याने विरोधी पक्षातील नेते असं वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्रातील जनता या सरकारसोबत आहे. संपूर्ण देशातील मजबूत सरकार महाराष्ट्रात आहे. तीन दिवसांचं सरकार जे केलं होतं त्याची आज पुण्यतिथी आहे” असे म्हणत राऊतांनी आपल्या शब्दात दानवेंना टोला दिला आहे.
तसेच “आता हे तीन महिन्यात करणार असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील, उद्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य काम करत आहे. तीन पक्षांचं सरकार असूनही भक्कम आहे. देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार महाविकास आघाडीचं आहे,” असे देखील राऊत पत्रकार परिषदेत म्हणले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
कोरोना लस उपलब्ध झाल्यावर पहिल्यांदा कोणाला मिळणार?
शाळा सुरू झाल्या पण विद्यार्थ्यांची उपस्थिती अवघी पाच टक्के!