मध्यंतरी झालेल्या टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मंगळवारी सुमारे १४०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. या टीआरपी घोटाळ्यामध्ये रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन मराठी वाहिन्यांची नावे समोर आली होती.
पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात १४० साक्षीदारांची नावे असून त्यात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क)चे अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ, फॉरेन्सिक ऑडिटर, जाहिरातदार, बॅरोमीटर लावणारे ग्राहक इतर काहींचा समावेश आहे.
तसेच यात ३ वाहिन्यांनी आपल्याला फसवले असा देखील आरोप जाहिरातदारांनी केल्याचे म्हणले आहे. सध्या मुंबई पोलिस रिपब्लिक टीव्हीच्या मुख्य संचालक अधिकारी प्रियंका मुखर्जी यांना अटक करण्याच्या तयारीत आहे. परंतु प्रियंका मुखर्जी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अटकेविरोधात याचिका दाखल केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी अगोदरच रिपब्लिक टीव्हीच्या पश्चिम भागाचे वितरण प्रमुख व दोन मराठी वाहिन्यांच्या मालकांसह १२ जणांना अटक केली आहे.
सोबत रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन वाहिन्यांचे फॉरेन्सिक ऑडिटही तपासात नोंद केली आहे. या नोंदीवर पुढे आणखी २ हजार पाने आरोपपत्रात समाविष्ट केली जातील. यात फॉरेन्सिक व तंत्रज्ञांच्या साक्षी असतील. यासाठी त्यांचे आरोपींचे फोन, लॅपटॉप व त्यांच्या कम्प्युटरमधील संभाषण, ईमेल, मेसेज व अन्य माहिती जप्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या – २८ नोव्हेंबरला पंतप्रधान पुण्यात…
अर्नब विरोधात विशेषाधिकार भंग प्रस्ताव आणणाऱ्या आमदार प्रताप सरनाईकांवर ईडीची कारवाई…
भारतात गुगल पे मोफतच राहणार; गुगलचं स्पष्टीकरण
अमेरिकन नागरिकांसाठी खुशखबर, डिंसेबरपासुन लसीकरणाला सुरुवात..