महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या माध्यमातून अभिनंदन मुलाखत घेतली होती. यात ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केले होते. परंतु या मुलाखतीचा हेतू हा विरोधकांना धमकावण्याचाच आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी “महाविकास आघाडीचं सरकार हे सगळ्या बाबतीत अपयशी ठरलेलं आहे. राज्याच्या इतिहासात धमकावणारे मुख्यमंत्री कधीही पाहिलेले नाहीत. याच्यामागे हात धुवून लागू, त्याची खिचडी करू, याचा खिमा करू अशी भांडणं नाक्यावर होतात. असं बोलणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. कारण चिरडण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात फार काळ टिकलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी शब्द संयमाने आणि जपून वापरावे” असे म्हणत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिलेल्या मुलाखतीत “आडवं येणाऱ्यांना आडवं पाडून महाराष्ट्र पुढे जाईल, अशा प्रकारची वक्तव्यं केली होती.
याला संतापून फडणवीसांनी “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री या पदाचा मान राखायला हवा. त्यांना माझा सल्ला आहे की मुख्यमंत्र्यांसारखे वागा. पदाला साजेसा संयम ठेवा आणि तो तुमच्या कृतीतून दिसू द्या. मुख्यमंत्र्यांची मुलाखतीत विकासावर चर्चा झालीच नाही. संपूर्ण मुलाखत टीका टिपण्णीमध्ये गेली. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला शोभणारी ती वक्तव्यं नव्हती. माझं असं प्रामाणिक मत आहे की उद्धव ठाकरे यांनी पाच वर्ष नक्की राज्य चालवावे पण नुसत्या धमक्या नकोत. त्यापेक्षा कायदा सुव्यवस्थेचं राज्य आणा”, अश्या भाषेत ठाकरेंना टोला दिला.
वाचा – भाजपच्या “या” नेत्याचं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन! म्हणाले…
शेतकऱ्यांच्या जिद्दीसमोर केंद्र सरकार नमले! दिल्लीत प्रवेश करण्यास परवानगी
अॅमेझॉन कंपनीवर ७ दिवस बंदी घालण्याची ‘कॅट’ ने का केली मागणी?