महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या माध्यमातून अभिनंदन मुलाखत घेतली होती.या मुलाखतीवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “मुलाखतीचा हेतू विरोधकांना धमकावण्याचाच आहे” असा आरोप केला होता.
या आरोपाला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी “आज विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत धमकीची भाषा केली. मला वाटत नाही की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं कुठेही बोलले. मात्र फडणवीसांना जर ही धमकीची भाषा वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे” असे म्हणले आहे.
तसेच त्यांनी “ही भाषा तर भयंकर धमकीची होती. त्यांची अशी अनेक वाक्य आहेत जी धमकी वाटू शकतात. म्हणजे सत्तेचा वापर करुन तुम्ही धमकी देऊ पहात होतात का? तसंच उद्धव ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर शिवसेना पक्ष प्रमुख आहेत हे कुणी विसरु नये. म्हणत फडणवीसांना आपल्या भाषेत प्रश्न विचारला आहे.