कोरोना पार्श्वभूमीवर सरकारने २३ नोव्हेंबर पासून ९ ते १२ चे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र महाविद्यालये सुरू बाबत सरकारने आपला मौन बाळगला आहे. मात्र, डिसेंबर अखेरीस महाविद्यालये सुरु होण्याचे संकेत सावित्री फुले पुणे विद्यापीठाने दिले आहेत. “विद्यार्थी आणि पालकांची संवाद साधल्यानंतर तसेच सुरक्षित अंतराच्या उपायोजना असल्यानंतर डिसेंबर महिन्याअखेरीस महाविद्यालये सुरू करण्यात येतील.” असे विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. नितीन करमळकर यांच्याकडून मंगळवारी सांगण्यात आले आहे.
महाविद्यालय सुरू करण्याबाबत नगर आणि नाशिक प्राचार्यांशी संवाद साधताना करमळकर यांनी ही माहिती दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन करून महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक काळ महाविद्यालये बंद होती. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालये सुरू करण्याबाबत विद्यापीठांच्या प्राचार्यांचे विचार सुरू आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची योजना
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार प्रथम गुगल फॉर्मद्वारे विद्यार्थी व पालकांची मते जाणून घेण्यात येतील. यानंतर कोरोनाचा पंधरा दिवसाचा आढावा घेण्यात येईल. महाविद्यालय सुरू करण्याअगोदर यूजीसीने आखून दिलेल्या नियमावलीचा विचार करून विद्यार्थ्यांची सुरक्षितता बघण्यात येईल. मग साधारण 20 डिसेंबर नंतर टप्प्याटप्प्याने विद्यालय सुरू करण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात बिगर व्यवसायिक आणि पारंपारिक अभ्यासक्रमांचे महाविद्यालय उघडण्यात येतील.
भाजपच्या “या” नेत्याचं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन! म्हणाले…
शेतकऱ्यांच्या जिद्दीसमोर केंद्र सरकार नमले! दिल्लीत प्रवेश करण्यास परवानगी
अॅमेझॉन कंपनीवर ७ दिवस बंदी घालण्याची ‘कॅट’ ने का केली मागणी?