कोरोणाच्या पार्श्वभूमीवर वारंवार एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे नैराश्य येऊन रत्नागिरी जिल्ह्यातील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात राहणाऱ्या महेश झोरे या तरुणाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याचे कारण देत गळफास घेऊन आत्महत्या केली.
कोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारला एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी लागत आहे, तसेच वाढते वय आणि परीक्षांची ही द्विधा स्थिती पाहून महेशने निराश होऊन अखेर राहत्या घरात गळफास घेतला. याप्रकरणी लांजा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्ये अगोदर महेशने परीक्षा वारंवार पुढे ढकलण्याचे कारण देत आत्महत्या करत आहोत असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
महेशच्या मृत्यू बद्दल अधिक चौकशी केली असता पोलीस प्रशासनाने कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. रत्नागिरी पोलिस अधीक्षकांकडे याबाबतचे विचारपूस केल्यास स्थानिक पोलिसांकडून याबद्दलची माहिती घ्या असे उत्तर दिले.
महेशचेआई वडील कामासाठी मुंबईला राहत असून त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे, अशा परिस्थितीही अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीने तो अभ्यास करत होता. मात्र परीक्षा वारंवार पुढे ढकलावी लागल्याने त्याला नैराश्याने घेरले आणि त्यातूनच त्याने हे पाऊल उचलले.
वाचा – कुंडल्या घेऊन बसलो आहे ही धमकीची भाषा, राऊंताचा फडणवीसांना पलटवार
मुलाखत बघून फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला हा सल्ला! म्हणाले…
भाजपच्या “या” नेत्याचं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन! म्हणाले…
शेतकऱ्यांच्या जिद्दीसमोर केंद्र सरकार नमले! दिल्लीत प्रवेश करण्यास परवानगी