लेखक, अभिनेता, दिग्दर्शक अशा विविध भूमिका साकारणार प्रवीण तरडे हे नाव मराठी सिनेरसिकांच्या अगदी जवळचं आणि परिचयाच झालं आहे. ‘देऊळबंद’ आणि ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमांच्या अभूतपूर्व यशानंतर प्रवीण तरडे यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. सिनेमाचं नाव ‘कोल्हापूर, बुलढाणा व्हाया इस्रायल’ असून, या सिनेमातून ते एक आगळीवेगळी प्रेमकथा ते साकारणार आहे.
प्रवीण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू होती. सिनेमाची पोस्टर्स, चित्रीकरणादरम्यानचे व्हिडिओज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच तरडे यांनी त्यांच्या ‘कोल्हापूर, बुलढाणा व्हाया इस्रायल’ सिनेमाची घोषणा केली आहे. त्यामुळे या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
“माझ्या आगामी प्रोजेक्टच्या माध्यमातून मी लव्हस्टोरी प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. मात्र, ही प्रेमकथा सामान्य प्रेमकथेसारखी नाही. माझे चित्रपट हे कायम शेतकरी किंवा सामाजिक विषयांशी निगडित असतात. त्यातून मी सामाजिक विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. हेच मुद्दे आगामी प्रेमकथेत देखील पाहायला मिळतील. माझ्या नव्या चित्रपटाचं नाव ‘कोल्हापूर, बुलढाणा व्हाया इस्रायल’ असं असणार आहे.” असं तरडे यांनी सांगितल आहे.
“इस्रायलमध्ये शेतीसाठी अनुकुल परिस्थिती नाही. मात्र, तरीदेखील त्यांनी शेतीमध्ये बराच विकास केला आहे. माझ्या कथेतील पात्रदेखील याच विषयाचा अभ्यास करताना दिसतील. तसच या चित्रपटातून नवीन कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळतील, असही ते म्हणाले आहेत.
दरम्यान मुळशी पॅटर्न या त्यांच्या मराठी सिनेमाचा ‘राधे’ हा हिंदी रीमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या मुख्य भूमिकेत सलमान खान दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
एका वर्षानंतर कम बॅक करत उर्मिला मातोंडकर करणार का शिवसेनेत प्रवेश?
तुमची पिढी संपेल पण हैद्राबादचे नाव भाग्यनगर होणार नाही; योगी आदित्यनाथ यांना ओवेसींचे प्रतीउत्तर