शिवसेनेचे खासदार संजय राऊत विरोधी नेत्यावरच्या टीकेमुळे आणि विविध विधानामुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी आता देखील भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना उद्देशून एक टोला लगावला आहे. त्याचबरोबर “ईडीसारख्या संस्था चीनच्या सीमेवर पाठवा” असा देखील खोचक सल्ला त्यांनी भाजपला दिला.
चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांच्याबद्दल बोलताना “आपण राऊतांबद्दल बोलायचं बंदच केलं आहे. राऊत एवढे मोठे आहेत की आपण लहान लोक त्यांच्याबद्दल काय बोलणार?” अशी बोचरी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून राऊत यांनी “तुमच्या डोळ्याला, तुमच्या कानांना त्रास होण्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी आपली नियुक्ती केली आहे.” असं बोलत राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.
त्याचबरोबर “सध्या बहुतेक नेत्यांवर ईडीची चौकशी आहे. त्यामुळे सध्या ईडी आणि सीबीआयची एवढी भीती आहे की, त्यांना चीनच्या सीमेवर लढण्यासाठी पाठवावं.” खोचक सल्ला देखील त्यांनी भाजपला दिला.