मुंबई | भगवतगीता पठन स्पर्धेच्या पाठोपाठ अजान स्पर्धेचं आयोजन शिवसेना करणार आहे. मुस्लिम समाजातील मुलांना अजानची गोडी निर्माण व्हावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासोबत अजानला विरोध करणं चुकीचं असल्याची प्रतिक्रीया शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी दिली.
“अजान पठन स्पर्धा देशात याआधी कुठेच झाली नाही असा हा पहीलाच प्रयोग असल्याने याला चांगला प्रतिसाद मिळेल, मुस्लिम समाजातील मुले अप्रतिम पध्दतीने अजान गातात. त्यामुळे या मुलांच्या कलागुणांना वाव देणं हो या स्पर्धेमागचा हेतु आहे” असं मत सकपाळ यांनी यावेळी व्यक्त केलं.
जर अजानमुळे कुणाल त्रास होत असेल तर ती गोष्ट मिठाच्या खड्यासारखी बाजूला काढा. आपल्याकडे अजानची परंपरा फार जुनी आहे त्यामुळे त्याला विरोध करणं चुकीचं आहे असं देखील पांडूरंग सकपाळ म्हणाले.