आपल्या आसपास प्राण्यांवर प्रेम करणारे अनेक लोक राहत असतात. सध्या अशीच हळव्या मनाची आणि प्राणीप्रेमी असलेली गायत्री नावाची व्यक्ती चर्चेत आली आहे. एका वीरा नावाच्या कुत्र्याचे दोन्ही पाय अपघातात गेले होते, त्यामुळे तो दोन्ही पायांनी लंगडत चालत होता. आता गायत्री यांनी कुत्र्यासाठी एक व्हीलचेअर बनवून दिली आहे. आता यावरून वीरा कुठंही फिरू शकतो. त्याचबरोबर वीराला दत्तक देखील घेतलं गेलं आहे.
गायत्री यांनी त्यांच्या वडिलांच्या मदतीने व्हीलचेअर बनवून घेतली. तिचे वडील हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. आपण वीराला एका आश्रय गृहातून दत्तक घेतलं असल्याचं गायत्री यांनी सांगितलं. “आपण कोरोना काळात घरी होतो त्यावेळी आपल्याला आपण कुत्रा पाळण्यासाठी चांगली वेळ असल्याची जाणवलं”, असं त्यांनी सांगितली.