१. आरटीजीएस आणि फंड ट्रान्सफर करण्याच्या सुविधेत रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) म्हणजेच आरटीजीएसच्या माध्यमातून 24 तासात कधीही पैसे ट्रान्सफर करता येऊ शकतात अशी घोषणा केली होती, तसेच महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार सोडून RTGS सिस्टीम मध्ये सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत फंड ट्रान्सफर करता येऊ शकतो.
२. PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्याची नियमात बदल करण्यात आला आहे. PNB च्या एटीएम मधून पैसे काढताना बँक वन टाइम पासवर्ड वर आधारित कॅश विड्रॉल करण्याची प्रणाली सुरू करणार आहे. येत्या 1 डिसेंबर पासून PNB 2.0 अंतर्गत ही नवी सुविधा सुरू होणार आहे. PNB च्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो द्यावा लागणार आहे. तसेच 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर त्यासाठी ओटीपी आवश्यक असणार आहे.
३. नाईट आवर्समध्ये दहा हजार पेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास ग्राहकांना ओटीपी बंधनकारक आहे, त्यामुळे ग्राहकांनी एटीएममध्ये जाताना मोबाईल बरोबर घेऊन जावा. प्रीमियमच्या बदलानुसार आता ग्राहक निम्म्या हप्त्यातही आपली पॉलिसी सुरू ठेऊ शकतात, म्हणजेच पाच वर्षांनंतर ग्राहक प्रीमियमची रक्कम 50 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.
४. १ डिसेंबर पासून काही नवीन रेल्वे गाड्याही सुरू होणार आहेत, कोरोना काळापासून रेल्वे काही विशेष गाड्या चालवत आहेत, त्यात आता आणखी पंजाब मेल आणि झेलम एक्स्प्रेसची भर पडणार आहे. तसेच या गाड्या सामान्य श्रेणी अंतर्गत धावणार आहेत.
५. दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी गॅसचे नवे दर घोषित केले जातात, परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबर प्रमाणे या महिन्यात ही गॅसच्या दरात बदल झालेला नाही मात्र 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडर मध्ये 55 रुपयांची वाढ झाली आहे.
वाचा – आशियाचा अकॅडमी अवॉर्ड समजला जाणारा “यंग सिनेमा अवॉर्ड” मराठमोळ्या अक्षय इंडीकर यांना…