नोएडामार्गे दिल्लीला उत्तर प्रदेशला जोडणारी चिल्ला सीमा बंद करण्यात आली आहे. “ ज्यांना नोएडाला जायचे आहे असे वाहन चालक गाझीपूर-अक्षरधाम उड्डाणपुलाच्या खाली आणि सराई काळे खान मार्गे यु टर्न घेऊ शकतात,” असे दिल्ली वाहतूक पोलिसांनी ट्विट केले.
सिंघू आणि टिक्रीच्या सीमेवर आधीच वाहनांच्या हालचाली थांबविल्यामुळे मंगळवारी दुपारी शेकडो शेतकरी दिल्ली आणि नोएडा दरम्यान चिल्ला सीमेवर जमा झाले. तेथे पोलिसांना वाहनेही थांबण्यास भाग पाडले.
“ राजधानी दिल्लीला नोएडामार्गे युपीला जोडणारी चिल्ला सीमा बंद करण्यात आली आहे. “नोएडाला जायचे आहे असे वाहन चालक गाझीपूर-अक्षरधाम उड्डाणपुलाच्या खाली आणि सराई काळे खान मार्गे यु टर्न घेऊ शकतात,” असे दिल्ली वाहतूक पोलिसांनी ट्विट केले.
सिंघू आणि टिक्री सीमेवरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे, परंतु दिल्ली-गुडगाव आणि दिल्ली-फरीदाबाद सीमेवर हालचाली सामान्य आहेत. “स्थानिक पोलिस चिल्ला बॉर्डरवर निदर्शकांना रस्ते मोकळे करण्यासाठी विनंती करीत आहेत.
दादरी, ग्रेटर नोएडा आणि नोएडामार्गे येणारे शेतकरी बहुतेक वेस्टर्न उत्तर प्रदेशातील आहेत. उद्या आणखी बरेच जण सामील होतील अशी अपेक्षा आहे. आम्ही त्यांना जवळच्या उद्यानात जाण्यास सांगितले आहे. ” असे नोएडा मधील डीसीपी ट्रॅफिक पोलिस गणेश साहा यांनी सांगितले.
“सीमा चिल्ला वगळता डीएनडीसह नोएडाच्या सर्व मार्गांवर सामान्य रहदारी असते. बर्याच लोकांचे प्रश्न असल्यामुळे आम्ही व्हिडिओ आणि फोटोंद्वारे रहदारीच्या परिस्थितीचा सतत आढावा घेत असतो असेही गणेश साहा यांनी सांगितले.
लोकांचे प्रश्न असल्यास आम्ही एक हेल्पलाइन नंबर देखील जारी केला आहे. 9971009001 या हेल्पलाइन नंबर वर नागरिक आपल्या प्रश्न सांगू शकतात. किंवा नोएडा ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत हँडलला भेट देऊ शकतात. गुडगाव ते दिल्ली दरम्यानचे सर्व मार्ग सध्या खुले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.