शिर्डी साई संस्थानाला रोज हजारो लोक भेट देत असतात, देशाच्या कानाकोपऱ्यातुन भाविक शिर्डीला भेट देण्यासाठी येतात. मात्र शिर्डी साई मंदिरात यायचं असेल भारतीय पेहरावातच येण्याचं आवाहन शिर्डी साई संस्थानाने केलं होत, यासोबत मंदिरात अशा आशयाचे फलक देखील लावण्यात आले आहेत.
मात्र यावर बोलताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानालाच प्रश्न विचारला आहे, की “मंदिरातले पुजारीच अर्धनग्न असतात, मग भाविकांच्या कपड्यावर निर्बंध का? TV9 मराठी सोबत बोलताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय.
गेल्या काही दिवसात मंदिरात येताना भक्त छोटे कपडे घालुन येतात हे निदर्शनास आल्याने हे आवाहन केलं असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र “कोणते कपडे घालायचं याचं भान भाविकांना आहे. भक्तांची श्रध्दा कपड्यांवरुन ठरवता येत नाही” असं देखील तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.
वाचा – आंदोलन करणारे शेतकरी नाहीत -केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह