नुकत्याच येऊन गेलेल्या निवार चक्रीवादळाचा धोका अजून संपत नाही तोवरच आणखी मोठे चक्रीवादळ येण्याचे संकेत मिळाले आहेत. हे चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. या चक्रीवादळाला बुरेवी हे नाव देण्यात आले आहे. किनारपट्टीवरील मासेमारी करणाऱ्या बांधवांना समुद्रकिनाऱ्यावर किंवा खाडीत न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा धोका जास्त आहे. त्यामुळे या दोन राज्यांमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट घोषित केला आहे.
बुधवारी संध्याकाळी हे चक्रीवादळ श्रीलंकेच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल. तर 3 डिसेंबर रोजी मुन्नारकडे आणि 4 डिसेंबरला कन्याकुमारी ते तमिळनाडूच्या दिशेनं जाण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. बुरेवी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केरळमधील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा आणि अलाप्पुझा जिल्ह्यांसाठी 3 डिसेंबर रोजी हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार हे चक्रीवादळ येत्या ४ डिसेंबर पर्यंत तामिळनाडूला पोहोचेल. यावेळी २ ते ४ डिसेंबर रोजी दक्षिण तामिळनाडूमध्ये मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या परिस्थितीविषयी नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी चर्चा केली आहे, मी त्यांना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल माहिती दिली आहे. असे केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन म्हणाले.
Had a telephone conversation with Tamil Nadu CM Thiru @EPSTamilNadu Ji. We discussed the conditions prevailing in parts of the state due to Cyclone Burevi. Centre will provide all possible support to TN. I pray for the well-being and safety of those living in the areas affected.
— Narendra Modi (@narendramodi) December 2, 2020
पुढील काही तासात बूरेवी चक्रीवादळ श्रीलंकेची पूर्व किनारपट्टी ओलांडेल. तामिळनाडू आणि केरळमध्ये ३ ते ५ डिसेंबर रोजी मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वाचा – एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १ हजार कोटींचा निधी मंजुर! राज्य सरकारचा निर्णय