गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. अनेक खेळाडूंनी देखील यामध्ये शेतकऱ्यांना समर्थन देताना आपण मिळालेले पुरस्कार परत करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे संस्थापक पंकज सिंह बादल यांनी देखील त्यांना मिळालेला पद्म विभूषण हा पुरस्कार परत करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
त्यांनी याबद्दल बोलताना असं सांगितलं आहे की, “मला खरंतर खूप वाईट वाटत आहे की, माझ्याकडे दुसरं काही देण्यासाठी काहीच नाही, मात्र मी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या सोबत आहे आणि मी माझा पद्म विभूषण पुरस्कार सरकारला परत करणार आहे.” “मी शेतकऱ्यांचं खूप देणं लागतो. मी शेतकऱ्यांमुळेच आहे. शेतकऱ्यांना बदनाम करून किंवा त्यांचा अपमान करून काहीच उपयोग नाही. मागच्या काही दिवसांत घडलेल्या गोष्टीमुळे मला खूप दुःख होत आहे.” अशा शब्दांत त्यांनी आपलं दुःख मांडलं आहे.
त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता यावर सरकार काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
वाचा – शेतकरी आंदोलनासाठी अर्जुन, पद्मश्री पुरस्कार विजेते पुरस्कार ठेवणार राजभवनाबाहेर…