कोरोना पार्श्वभूमीवरील हालचाली बघता बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
कोरोना काळात तलाठी भरतीची कामे रखडली होती. यामुळे ७ जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. मात्र आता सामान्य प्रशासन विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायास अनुसरुन ७ जिल्ह्यातील २०१९ मध्ये तलाठी पदभरतीतील एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत मान्यता मिळाली आहे.
त्यामुळे बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यातील सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना या निर्णयाबाबत माहिती दिली गेली आहे. २०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात राज्यातील २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. यानंतर तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले होते.
वाचा – सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही -शरद पवार
फडणवीस सरकारने केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची होणार चौकशी…
तामिळनाडू , केरळला बुरेवी चक्रीवादळाचा धोका…
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १ हजार कोटींचा निधी मंजुर! राज्य सरकारचा निर्णय