राज्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, सिध्दी विनायक मंदिर न्यास मुंबई व विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती पंढरपूर अशी अनेक महत्त्वाची महामंडळे राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता येताच त्यांनी ही वाटून घेतली आहेत. गेल्या वर्षी महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर सरकारने भाजप काळात स्थापन झालेली अनेक महामंडळे बरखास्त केली होती. मात्र देवस्थानं समित्यांमध्ये कोणताच बदल केला नाही.
मात्र आता लवकरच सरकार या देवस्थानं समित्या देखील बरखास्त करणार असल्याने समोर आले आहे. तसेच सध्याच्या समित्या बरखास्त करण्याची फाईल तयार करण्यात आली आहे. नवीन समित्यांचे पदाधिकारी निश्चित होताच या समित्या बरखास्त करण्यात येणार आहेत.
दरम्यान भाजपच्या ताब्यातील देवस्थान समित्या काढून घेण्यासाठी गेले महिनाभर राज्यपातळीवर अनेक हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आघाडीतील मित्रपक्षांनी या समित्या वाटून घेतल्या आहेत. त्यानुसार सिद्धविनायक व पंढरपूरची समिती सेनेकडेच राहणार आहे.