टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार रैना गुप्ता (वय२२) आणि मोहम्मद असिफ (वय २४) यांचे दोन धर्मांच्या रीतीरिवाजानुसार लग्न होणार होते पण हिंदू महासभा जिल्हाप्रमुखांच्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि हे लग्न थांबवण्यात आले.
या प्रकरणात कोणतीही एफआयआर नोंद करण्यात आलेली नाही, कारण डीएमची परवानगी येईपर्यंत दोन्ही कुटुंबांनी हे लग्न रद्द करण्याचे मान्य केले आहे. नवीन कायद्यानुसार लग्नासाठी डीएमची परवानगी आवश्यक आहे आणि नोटीस दिल्यानंतर दोन महिन्यांनंतरच लग्न करता येईल.
अतिरिक्त डीसीपी (दक्षिण विभाग) सुरेशचंद्र रावत यांच्या माहितीनुसार “जेव्हा पोलिस लग्नसोहळ्यावर आले तेव्हा हिंदू रूढी आणि त्यानंतर मुस्लिम रीतिरिवाजांशी लग्न करण्याची तयारी सुरू होती. दोन्ही कुटुंबांनी या लग्नाला सहमती दर्शविली परंतु नियोजित धार्मिक समारंभ धर्म परिवर्तन केल्याशिवाय होऊ शकत नाहीत. ”
तसेच ‘उत्तर प्रदेश कायद्याविरूद्ध धर्म निषेध अध्यादेश -२०२०’ अंतर्गत हे विवाह थांबविण्यात आले आहे, ज्यामुळे कोणताही माणूस थेट किंवा सक्तीने धर्मांतर करू शकत नाही किंवा तो दंडनीय गुन्हा आहे.