पतंजली, डाबर, यांसारख्या अनेक बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटने (CSE) सर्वाधिक मध तयार करणाऱ्या कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याचे म्हणले आहे.
सीएसईनं १३ छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले होते. या कंपन्यांच्या मधात ७७ टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचं दिसून आलं. मधाच्या २२ मापदंडांपैकी काही कंपन्या केवळ ५ मापदंडांमध्ये खऱ्या उतरल्याची माहिती या तपासातून दिसून आली आहे.
सीएसईने केलेल्या या तपासात पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालयसारख्या कंपन्यांच्या मध शुध्दतेचं प्रमाण तपासणाऱ्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (NMR) या चाचण्या या अयशस्वी ठरले आहेत.
परंतु या कंपन्यांनी हा तपास खोटा असल्याचे म्हणले आहे. “आम्ही भारतात नैसर्गिक रित्या मिळणारा मधच एकत्र करतो आणि त्याची विक्री करतो,” असा दावा या कंपन्यांकडून करण्यात आला आहे.