केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 8 दिवसांपासून पंजाब, हरियाणा इथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आज त्याचा ९ वा दिवस आहे. कृषी बिल रद्द करा केवळ आश्वासन नको ठोस निर्णय घ्या आपल्या या मतावर शेतकरी ठाम आहेत. यावर सरकार कोणतीच स्पष्टतेची घेत नसल्यामुळे आज शेतकर्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
यासाठी टोल नाका आणि महत्त्वाच्या रस्त्यावर गाड्या रोखून धरण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे. “आज झालेल्या चर्चेवर जर केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर नवीन कृषी कायद्यांविरोधात त्यांचे आंदोलन तीव्र केले जाईल” असे शेतकरी नेते गुरनामसिंग चधूनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
तसेच “आज झालेल्या बैठकीत आम्ही 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.” असे भारतीय किसान युनियनचे सरचिटणीस हरिंदरसिंग लखवाल यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान आज पुन्हा एकदा पाचव्यांदा शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेदरम्यान तरी तोडगा निघणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत आतापर्यंत झालेल्या 4 बैठका निष्फळ झाल्या असून अद्यापही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
वाचा – अभिमानास्पद! पंधरा वर्षांच्या गीतांजली रावला टाईम्सचा ‘किड्स ऑफ दी इयर’ पुरस्कार