पंजाबी गायक दिलजित सिंग दोसांझने याने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दाखवत या शेतकऱ्यांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना एक कोटी रुपयांची मदत केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ मधून त्याने ही माहिती दिली आहे. या पैशातून शेतकऱ्यासाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट मिळणार असल्याचे त्याने म्हणलं आहे.
तसेच त्याने शेतकऱ्यांना ” आमची एकच विनंती आहे की, आमच्या शेतकऱ्यांची मागणी पुर्ण केली जावी. सर्वजण येथे शांत बसले आहेत. संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आपल्या सर्वांना नमस्कार, शेतकर्यांनी एक नवा इतिहास रचला आहे. हा इतिहास येणाऱ्या पुढच्या पिढीला सांगितला जाईल.” म्हणत त्याने आशावाद व्यक्त केला.