सध्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी चालू केलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. शेतकऱ्यांवर चालवलेल्या अन्यायामुळे सरकारवर देशभरातून टीकेची झोड उठत आहे. आता महाराष्ट्रातील राज्यमंत्री बच्चु कडू महाराष्ट्रातून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ दुचाकीवर कार्यकर्त्यांसह दिल्लीला रवाना झाले आहेत.
बच्चु कडू तीन दिवसांपूर्वी आपण दिल्लीला जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. सरकारने अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा न काढल्यामुळे त्यांनी आज राष्ट्रसंतांच्या समधीवरून दिल्लीला रवाना होण्याचा निर्णय घेतला.
आज राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळावर राज्यभरातून अनेक कार्यकर्ते आले होते. त्यावेळी बोलताना बच्चु कडू यांनी सरकारवर मोठी टीका केली. “केंद्र सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणंदेणं नाही, त्यांना फक्त अंबानी, अडाणी वर्गाचे पडले आहे. असले काळे कृषी कायदे आपण खपवून घेणार नाही.” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.