गेले २ आठवडे शेतकरी कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचे शोषण करणारे हे जाचक कायदे रद्द करावे तसेच अजुन काही मागण्या पूर्ण कराव्या अशी भूमिका या शेतकऱ्यांची आहे. यासाठी देशभरातून शेतकऱ्यांना पाठिंबा मिळत आहे. आता माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी देखील याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
“सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, सरकारने याबाबत शहाणपणाची भूमिका घेणं महत्वाचं ठरणार आहे.” अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारला सल्ला देत आपलं मत मांडलं आहे.
आतापर्यंतच्या झालेल्या शेतकरी आणि सरकार यांच्यात झालेल्या चर्चा या निष्फळ ठरल्या आहेत. यापुढे होणाऱ्या बैठकीत तोडगा निघावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आणि सर्व समर्थकांना आहे. यापुढील चर्चा ही ९ डिसेंबरला होणार आहे.
वाचा – संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांनी घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
शेतकरी आंदोलन -बच्चु कडू समर्थकांसह दुचाकीवर दिल्लीकडे रवाना