आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त शरद पवार, अजित पवार हे चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर येताना त्यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. अचानक संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट झाल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
संजय राऊत यांच्यावर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज भेटल्यानंतर डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती करण्याचा तसेच कमी बोलण्याचा सल्ला दिला असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्यानंतर आज संजय राऊत यांना भेटण्यासाठी शरद पवार, अजित पवार तसेच इतर मंत्री गेले होते.
वाचा – शेतकरी आंदोलन -बच्चु कडू समर्थकांसह दुचाकीवर दिल्लीकडे रवाना