गुजरात विद्यापीठांतर्गत असणाऱ्या एका कॉलेजमधील मुलीने आपल्या इंटर्नल एक्झामच्या गुणांमध्ये झालेल्या गोंधळामुळे आरटीआय दाखल केली होती. इंटर्नल परीक्षेच्या मार्कलिस्टची प्रत मिळवण्यासाठी या विद्यार्थिनीने आरटीआय टाकला होता.
मात्र कॉलेजने ‘आधी आपली नागरिकता सिध्द करा’ असं सांगितलं आहे. मुलीचं म्हणणं आहे की, संविधानात आरटीआयसाठी असा कोणताच नियम नाही. ही विद्यार्थिनी गांधीनगरमधील सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये शिकत आहे. आपल्या सहाव्या सेमिस्टरसाठी झालेल्या इंटर्नल परीक्षेमध्ये गोंधळ झाला असल्याचं तिचं म्हणणं आहे.
आणखी वाचा: सिध्दांतने केली साधी चूक आणि आयआयटीला भेटलेली जागा गमावली!
त्यासाठी तिला मार्कशीटच्या प्रती हव्या होत्या आणि त्यासाठी तिने १९ ऑक्टोबर रोजी आरटीआय दाखल केली, मात्र परीक्षा विभागाने तिला आधी भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्याबाबत सांगितलं आणि त्याशिवाय तिला ही माहिती भेटू शकत नाही, असं स्पष्ट केलं.
मुलीचं असं म्हणणं आहे की, इंटर्नलमधील मार्क्समध्ये विद्यापीठ आणि कॉलेजने दिलेल्या मार्क्स मध्ये फरक आहे. यासाठी आपण आरटीआय दाखल केली होती, आता आपण यासाठी हाय कोर्टात जाणार असल्याचं तिनं सांगितलं आहे.