बारामतीपासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिर्सुफळ गावातील 20 ते 30 शेतकऱ्यांच्या तब्बल 25 एकर ऊस क्षेत्राला आग लागली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखोंचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जातेय.
सध्या ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच या क्षेत्रातील इतर पिकांना देखील या आगीचा धोका निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जळून गेलेला ऊस दौंड साखर कारखाना आणि बारामती ॲग्रो साखर कारखाना यांनी दोन दिवसात घेऊन जाण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
द भोंगाला ऊसाला लागलेल्या आगीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ मिळाला आहे.