मुंबई। शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे भाजप नेते रावसाहेब दानवेंना उपरोधक टिकेला सामोरे जावे लागत आहे. “शेतकरी आंदोलन हा एक कट आहे” असे ते म्हणाले आहेत. मात्र आता त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासोबतच “शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान व चीनचा हात आहे” असेही दानवे म्हणाले होते, मात्र “त्यांचं हे वक्तव्य तथ्यहीन आहे शेतकरी आंदोलनाबद्दल असं बोलणं चुकीचं आहे” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. रावसाहेब दानवे परत म्हणतील मी असं काही बोललेच नाही. असा उपरोधक टोलाही पवारांनी लगावला.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाबाबत सरकारने हटवादीपणा सोडायला हवा असेही अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले