पश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळायला सुरूवात झाली असून आज भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
कैलाश विजयवर्गीय यांनी कारमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्यांचा ताफा जात असताना रस्त्यावर निषेध करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होत असल्याचं दिसत होत. तसंच दगडफेक करत गाडीच्या काचाही फोडल्याचं देखील या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
बंगाल पुलिस को पहले ही राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda जी के कार्यक्रम की जानकारी दी गई थी, लेकिन एक बार फिर बंगाल पुलिस नाकाम रही। सिराकोल बस स्टैंड के पास पुलिस के सामने ही #TMC गुंडों ने हमारे कार्यकर्ताओं को मारा और मेरी गाड़ी पर पथराव किया। #BengalSupportsBJP pic.twitter.com/G882Ewhq9M
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) December 10, 2020
कैलाश विजयवर्गीय यांनी आपल्या ट्विट मध्ये “बंगाल पोलिसांना जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. पण पुन्हा एकदा बंगाल पोलीस अपयशी ठरली. पोलिसांसमोर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि माझ्या गाडीवर दगडफेक केली,” असे म्हणले आहे.
दरम्यान दिलीप घोष यांनी बुधवारी जे पी नड्डा उपस्थित असणाऱ्या भाजपाच्या कार्यक्रमात योग्य सुरक्षा नसल्याचा आरोप केला होता. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला होता.