देशातून कृषी कायद्याला विरोध होत असताना नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ‘भारतात जरा जास्तच लोकशाही आहे’, असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कृषी कायद्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की भारतात कठोर सुधारणा लागू करण्यासाठी खूप अडचणी येतात. कारण भारतात जरा जास्तच लोकशाही आहे.
स्वराज्य मॅगझिनच्या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले की केंद्र सरकारने कोळसा खाणकाम कृषिक्षेत्रात अगोदरच कठोर सुधारणा लागू केल्या आहेत.
‘चीनसारख्या देशासोबत स्पर्धा करायची असल्यास भारतात कठोर सुधारणा लागू करणे गरजेचे असल्याचे देखील ते म्हणाले. केंद्र सरकारने या सुधारणा लागू करण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवली आहे. आता पुढची जबाबदारी राज्यांचे असेल’, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या – दिशा कायद्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘शक्ती’ कायदा सज्ज…