रावसाहेब दानवेंनी शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वादाला तोंड फुटले आहे. शेतकरी आंदोलन हे चीन व पाकिस्तानचा कट आहे असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “जर शेतकरी आंदोलन हे चीन व पाकिस्तानचा कट असेल तर सरकारने लगेच चीन व पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा. देशातील राज्यमंत्री जर हे वक्तव्य करत असतील तर त्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.”
“देशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करणाऱ्या गोष्टी विरोधात केंद्र सरकारने भूमिका घेतली पाहिजे. यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, पंतप्रधान व राष्ट्रपती यांनी मिळून याचा गंभीरतेने विचार करावा. एक देशभक्त म्हणून शिवसेना आवाहन करते की देशाच्या हिताचा विचार करावा. आणि चीन व पाकिस्तानवर कारवाई करावी.”
दरम्यान, शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे विधान रावसाहेब दानवे यांनी केले होते. या विधानावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.