शिर्डी। भाविकांनी साधा व सभ्य पोशाख परिधान करावा असे आवाहन साई संस्थानाने केले आहे. मात्र साई संस्थांनाच्या या फलकावर तृप्ती देसाईंनी आक्षेप नोंदवला आहे. यामुळे साई संस्थानाने तो फलक हटवावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
जर मंदिरमध्ये अर्धनग्न ब्राह्मण चालत असतील तर महिलांच्या कपड्यावर बंधन का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळेच भूमाता ब्रिगेड आणि ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. याची खबरदारी म्हणूनच तृप्ती देसाई यांना सूपा पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले आहे.
लॉकडाउन नंतर मंदिरे सुरु झाली आणि भाविकांनी दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली. शिर्डीमध्ये देश विदेशामधून भाविक दर्शनासाठी येतात. मात्र गेले काही दिवस भाविक छोटे कपडे घालून येत असल्याची तक्रार आल्यामुळे साई संस्थेने हे आवाहन केले आहे.
मात्र, मंदिरामध्ये कोणत्या प्रकारचे कपडे घालावे याची समज भक्तांना आहे. यामुळे तो फलक हटवावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
वाचा – पुजारी अर्धनग्न मग भाविकांच्या कपड्यांंवर निर्बंध का? तृप्ती देसाईंचा शिर्डी संस्थानाला सवाल