दिल्ली | उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्या घरावर भाजपच्या जमावाने हल्ला केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्ला केल्याची दृष्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. सिसोदीया यांनी ट्विट करुन ही माहीती दिली आहे.
यासोबत भाजपच्या गुंडांचा जमाव त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत जात जातानाची दृष्य समोर आली आहेत, सिसोदीया यांच्या पत्नी आणि मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केलाय. यावर बोलताना सिसोदिया म्हणाले की “अमित शहा तुम्ही दिल्लीच्या राजकारणात हरलात म्हणून असं करणार का?” असा सवाल त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना विचारला आहे.
आज बीजेपी के गुंडे मेरी ग़ैरमौजूदगी में मेरे घर के दरवाज़े तोड़कर अंदर घुस गए और मेरे बीवी बच्चों पर हमला करने की कोशिश की. @AmitShah जी आज आप दिल्ली में राजनीति में हार गए तो अब इस तरह से हमें निपटाएँगे? pic.twitter.com/aDwjz6DR3B
— Manish Sisodia (@msisodia) December 10, 2020
दरम्यान, कृषी विधेयका विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटायला जाताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.
वाचा – शेतकरी संघटनांची सर्वोच्च न्यायालयात धाव; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा