मुंबई। राज्य सामान्य प्रशासन विभागानुसार अनेक वेळा मंत्रालायमध्ये सरकारी कर्मचारी अधिकरी हे अशोभनीय कपड्यामध्ये वावरताना दिसतात. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची प्रतिमा खराब होत आहे. यासाठीच आता मंत्रालय व सरकारी कार्यालयामध्ये जाताना सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना ड्रेसकोडची सक्ती केली आहे.
अनेक अधिकारी- कर्मचारी हे सरकारी कार्यालयामध्ये जीन्स- टी शर्ट , भडक रंगाचे अशोभनीय कपडे, पायामध्ये स्लीपर असा ओंगळवाना पेहराव करून येतात. या वेशभूषेचे प्रतिबिंब कर्मचाऱ्यांच्या व्यक्तित्वावर व कामावर उमटते म्हणून यांना ड्रेसकोड लागू केला आहे. महिला अधिकारी व कर्मचारी यांनी पायामध्ये सॅंडल व बूट वापरावेत. साडी किंवा कुर्ता असा पेहराव करावा. पुरुष अधिकारी व कर्मचारी यांनी फॉर्मल कपडे वापरावेत. साधा शर्ट व पॅन्ट घालावे. जीन्स व टी शर्ट वापरण्यावर सक्त मनाई केली गेली आहे.
दरम्यान या नवीन नियामानुसार प्रत्येक शुक्रवारी खादीचे कपडे घालावे लागणार आहेत. रंगबेरंगी कपडे चालणार नाहीत याच सोबत स्लीपर व टी शर्ट वापरण्यास मनाई केली आहे.