नवी दिल्ली। शेतकऱ्यांचे आंदोलन हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. केंद्र सरकारसोबत तडजोड न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असुन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी ठाम उभा आहेत केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी हा घाट आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे. आणि यामुळेच शेतकऱ्यांनी अदानी अंबाणीचे टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन हे अधिक तीव्र होणार असून, हे आंदोलन देशव्यापी करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
14 डिसेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून त्याचदिवशी अंबानींच्या रिलाइन्स व अदानीचे टोलनाके बंद पडले जातील.याचबरोबर कोणतीही रेल्वे अडवली जाणार नाही अशी माहिती भारतीय किसान युनिअनचे नेते बलबीर एस. राजेवाल यांनी दिली.
दरम्यान, शेतकरी आंदोलन हे गेले सोळा दिवस झाले सूरु आहे. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी अजून सुरूच आहे. या आंदोलनास शेतकरी मजूर संघर्ष समितीचे सदस्य अमृतसरहुन दिल्लीकडे रवाना झाले आहेत.जवळ जवळ 700हुन अधिक ट्रॅक्टर-ट्रॉली सिंधू सीमेजवळ निघाली असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.