नवी दिल्ली। अखेर कोरोना लशीची प्रतीक्षा संपली आहे. लवकरच ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र केरळ, मध्य प्रदेश, आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. या सर्व राज्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी नुकतीच राज्यात मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. केरळ मध्ये एकूण रुग्णांची संख्या ६.६४ लाख असून, मृतांची संख्या ही २,५९४ एवढी आहे. तर ५,९४९ नव्या रुग्णांचा आकडा आहे. सद्यस्तिथीमध्ये एकूण ४३७ कोरोना हॉटस्पॉट केरळमध्ये बनले आहेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिहं चौहान यांनी देखील राज्यात मोफत कोरोना लस देण्याचं आवाहन नागरिकांना केले आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील सर्व गरिबांना मोफत लस मिळेल व आपण हे युद्ध जिंकू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या व्यतिरिक्त आसाम, तामिळनाडू व तेलंगणा या राज्यात देखील मोफत लस मिळणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानिस्वामी व तेलंगणाचे आरोग्य मंत्री इटेला राजेंदर यानीही गरीब व आरोग्य कर्मचारी यांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.