भाजपच्या ओबीसी कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सरकारला मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावण्याचा सल्ला तसंच या मुद्द्यांवरून सरकारवर टीका देखील केली.
“मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत दुमत नाहीच, मात्र यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणात आम्हाला वाटेकरी चालणार नाही”, असा इशारा त्यांनी दिला आहे. जर असं काही झालं तर आपण रस्त्यावर उतरू असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
अध्यादेश काढावा
सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असा अध्यादेश काढावा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. याबाबत काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची देखील कोणतीच भूमिका नाही, ती देखील स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.