महाविकास आघाडी आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. सध्या ते नाशिक दौऱ्यावर असून नाशिक महानगर पालिकेवर भगवा फडकवायचा आहे असंही त्यांनी सांगितले. आणि यासाठीच महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत असे ते म्हणाले.
एकीचे बळ हे कायम श्रेष्ठ असते. पदवीधर मतदार संघ, शिक्षक मतदार संघ एकत्र लढल्यामुळे त्यांना यश मिळालं, तसेच महाविकास आघाडी एकत्र आली तर नक्कीच आम्ही जिंकू असा विश्वास राऊत यांनी दाखवला.
दरम्यान, राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे व शरद पवार याचा देखील उल्लेख केला. मी कधीही यांचे वय मोजले नाही. “वयाच्या शृंखला यांना कधी अडकून ठेवू शकत नाहीत” असे वक्तव्य त्यांनी केले. मला या दोन्ही नेत्याचा उत्तम सहवास लाभला याचा कायम मला आनंद वाटतो असेही ते म्हणाले.
वाचा – मोफत कोरोना लशीसाठी “ही” राज्य ठरणार लाभार्थी…तुमचं राज्य आहे का?