राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल 80वा वाढदिवस झाला. संपूर्ण महाराष्ट्रतून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव झाला. या निमित्ताने आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांवर एक फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्ट मध्ये शरद पवारांचा महिला सबलिकारणांमध्ये मोठा वाटा असल्याचे लिहिली आहे.
स्त्री सक्षमिकरण ही किमया प्रत्यक्ष कृतीत पवार साहेबांमुळे आली असेही त्यांनी या पोस्टद्वारे मांडले आहे. स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवू शकते असा विश्वास शरद पवारांनी दाखवला व त्यामुळेच आज राजकारण व समाजकारांमध्ये स्त्रियाना समान संधी दिली गेली आहे.
महिला सक्षमीकरणासाठी आरक्षणाची तरतूद!
आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या ८० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत असे अनेक निर्णय घेतले, ज्याचा प्रभाव दीर्घकाळ राहीलच पण सामाजिक जडणघडणीत हे निर्णय…https://t.co/QAtsDBZAg6 pic.twitter.com/cIEf7PHbEZ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 12, 2020
1993 साली पवार साहेबांनी देशामध्ये प्रभावी महिला धोरण आखले. आणि त्याची अंमलबजावणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 33% आरक्षणाची तरतूद केली. महिला व बालकल्याण खाते वेगळे केले.
महिला साक्षमीकरणाच्या संकल्पननेमुळे महिलांच्या विकासामध्ये भर पडली. यामुळे आज गावापासून ते शहारापर्यंत महिला मोठ्या हिमतीने आपला कारभार चालवताना दिसतात. महिला साक्षमीकरणामुळे पवार साहेबांनी राज्यातील महिलांच्या विकासाला चालना दिली असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टद्वारे लिहिले.