नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशामध्ये सुरु असलेल्या चीनच्या सिनोफार्म कोव्हिड १९ लसीची चाचणी थांबवली आहे.
गेल्या शनिवारी पेरु सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने एक जारी केलेल्या पथकानुसार या लसीची चाचणी सुरु होती. यावेळी एका स्वयंसेवकावर लसीचा विपरित परिणाम दिसून आल्यामुळे ही चाचणी तातडीने थांबवण्यात आली आहे.
परंतु या विपरित परिणामाला लस कारण नसून अन्य कोणतीतरी गोष्ट कारण असण्याची शक्यात व्यक्त केली जात आहे. तरी याचा तपास सुरु असल्याने त्यातून समोर येणारी माहित अधिकृत असेल असंही सांगण्यात येत आहे.
तसेच सिनोफार्म ही चिनी कंपनी पेरूमध्ये १२ हजार स्वयंसेवकांच्या मदतीने आपल्या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणीच्या लसीकरणाला सुरुवात करणार होती. यासाठी कायतानो हेरेडिया युनिव्हर्सिटीचे मुख्य संशोधक असणारे जर्मन मलागा जोकि हे सुद्धा या संशोधनात सहभागी झाले होते.
दरम्यान मागील आठवड्यामध्येच संयुक्त अरब अमिरातीमध्ये सिनोफार्मच्या लसीची चाचणी करण्यात आली होती. यात युएईमधील चाचणीमध्ये ३१ हजार जण सहभागी झाले होते. यावेळी ही लस स्वयंसेवकांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यात ८६ टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरल्याचे म्हटलं होतं.