मुंबई। हिवाळी अधिवेशन नुकतेच सुरु झाले असून विरोधकांनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. “आपले मुख्यमंत्री रशिया व अमेरिकेबद्दल बोलतात त्यांनी आधी मुंबईमध्ये काय दिवे लावलेत” ते बघा अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“राज्यात अघोषित आणीबाणी जाहीर केली राज्यात सरकार विरोधी बोलणाऱ्यांना गजाआड केले जात आहे” असा आरोप ही विरोधी नेत्यांनी लावला आहे. फडणवीसांच्या या आरोपाल उध्दव ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “राज्यामध्ये अघोषित आणीबाणी आहे तर देशामध्ये काय घोषित आणीबाणी आहे काय?” असा सवाल ठाकरेंनी केला.
दरम्यान, भाजप शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवत आहेत, हा प्रकार आणीबाणी पेक्षाही गंभीर आहे असंही उध्दव ठाकरे म्हणाले.