मुंबई। मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटला नाही. यामुळे आज मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. या मुद्द्याला धरत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर टिका केली आहे.
“आघाडी सरकारने मोगलाई शासन सूरु केले आहे” असे टिकास्त्र त्यांनी सोडले. आझाद मैदानावरील सूरु असलेल्या आंदोलनाचा आढावा त्यांनी घेतला आहे. यानंतर ट्विटरवरून त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
आघाडी सरकारचं मोघलाईचं राज्य सुरु आहे. आंदोलनकर्त्या मराठा तरुणांवर केसेस दाखल करण्यात आल्या.अधिवेशन चालू असताना लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी मुंबईत येणाऱ्या मराठा तरुणांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे.तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका.@CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/4zmYc19mmO
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 14, 2020
“मी मराठा समाज्याच्या बाजूने उभा आहे अशी माहिती ही त्यांनी दिली. आंदोलन करणाऱ्या मराठा तरुणावर केस टाकण्यात येत आहेत. त्यांची अडवणूक होत आहे. या तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका” असेही दरेकर म्हणाले.
ईबीसी गटामधून नियुक्त केलेले पण नोकरी न मिळालेले मराठा उमेद्वार उपोषणास बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आठ दिवसात नोकरी देण्याचं आवाहन केलं होतं.मात्र आठ महिने उलटले तरी काहीच मदत त्यांना मिळाली नाही. अशी टीका ही प्रवीण दरेकर यांनी केली आहे. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत असेल तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा प्रवीण दरेकर यांनी केला.