मुंबई। मुंबईमध्ये सध्या मराठा आंदोलन तीव्र होत चालले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अजून सुटला नाही. यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. शेतकाऱ्यांप्रमाणे आम्ही ही नाकेबंदी करू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे.
या आंदोलनास पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक देखील येऊ लागले आहेत. आरक्षणाची सुनावणी ही जानेवारीमध्ये होणार असून तूर्तास या सुनावणीस स्थगिती देण्यात आली आहे. आरक्षण होत नाही तोपर्यंत नोकरी मिळणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे.
दरम्यान, या आंदोलनासाठी मुंबईच्या वेशीवर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबई बाहेरील नागरिक या आंदोलमध्ये सहभागी होऊ नयेत म्हणून ही उपाययोजना केली गेली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस-वे वरती पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. याचबरोबर गाड्यांची तपासणी केली जात आहे.
मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समिती जाहीर केली असून, अॅड. आशिष गायकवाड, अॅड. राजेश टेकाळे, अॅड. रमेश दुबे पाटील, अॅड. अनिल गोळेगावकर व अॅड. अभिजीत पाटील यांचा या समितीमध्ये समावेश आहे.
वाचा – आघाडी सरकारने मोगलाई शासन सुरु केले आहे -प्रविण दरेकर
“मला कितीपण ट्रोल करा, मी थांबणार नाही” अमृता फडणवीस यांचा इशारा
मराठा आरक्षणावरुन टिका करणाऱ्यांवर अजित पवार भडकले! म्हणाले…
Fact check: शेतकरी आंदोलन-ओबामा यांचा आंदोलनाला पाठिंबा?