राज्यात मराठा आरक्षणाचा वरून चांगलेच राजकारण तापले आहे. यात राजकीय नेत्यांमध्ये ही आरोप प्रत्यारोपांचा वर्षाव सुरू आहे. दरम्यान यात निलेश राणे यांनी ही यात सहभाग घेउन राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. गेल्या सोमवारी ठाण्यातील आनंदनगर येथून मुंबईच्या दिशेनं जात असलेल्या एसटी महामंडळाच्या बसवरील भगवा झेंडा पोलिसांनी हटवण्यास सांगितला होता. त्यानंतर एसटी चालकानं हा झेंडा काढल्याचा प्रकार घडला होता.
यावर “स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं. त्या महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांचा झेंडा काढण्याची वेळ या ठाकरे सरकारने आणली. महाराष्ट्रात ‘जय जिजाऊ जय शिवराय’चे झेंडे लावायचे नाही तर काय पाकिस्तानचे लावायचे?,” असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला आहे.
दरम्यान मराठा आरक्षणाबाबत मराठा क्रांती मोर्चाकडून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची शक्यता लक्षात घेता मुंबईत पोलीसांनी मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्यांची करण्यास सुरूवात केली होती. यावेळी हा झेंडा काढून टाकण्याचा प्रकार घडला होता.
वाचा – धक्कादायक! राज्यात ११ महिन्यात १७३ बिबट्याचा मृत्यू…
शेतकरी आंदोलनाआडून एअरटेल व्होडाफोन लोकांना भडकवत आहे -जिओची तक्रार
“फेकुचंद पडळकर”! पडळकरांवर सामनातून टीका…