कर्नाटक विधानपरिषदेमध्ये मंगळवारी सभागृहाचे कामकाज चालू होताच काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना जबरदस्तीने खुर्चीवरुन खेचून काढल्याचा प्रकार घडला आहे. शेवटी हाऊसमधील मार्शल्सना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. उपसभापतींनी त्यांच्या खुर्चीवर बसणे असवैधानिक असल्याचे आम्ही असे केल्याचे या आमदारांनी म्हणले आहे.
सभागृहात झालेल्या प्रकारावर अनेक विरोधी नेत्यांनी टिका केली आहे. “काही आमदार गुंडासारखे वागले. त्यांनी उपसभापतींना जबरदस्तीने खुर्चीवरुन खेचलं. त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं. विधानपरिषदेच्या इतिहासात इतका लाजिरवाणा दिवस आम्ही बघितलेला नाही. लोक आमच्याबद्दल काय विचार करतील, तो विचार करुन मला लाज वाटते” असे भाजपाचे आमदार लेहर सिंह सिरोया यांनी म्हणले आहे.
#WATCH Karnataka: Congress MLCs in Karnataka Assembly forcefully remove the chairman of the legislative council pic.twitter.com/XiefiNOgmq
— ANI (@ANI) December 15, 2020
दरम्यान सभा सूरू असताना उपमुख्यमंत्री अश्वथानारायण आणि काँग्रेस आमदारांमध्ये शाब्दीक वादावादी सुरु झाली होती. तर काँग्रेसने विधानपरिषदेच्या सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला होता. गोहत्या बंदी विधेयकाविरोधात काँग्रेसला मतदान हवे होते. काँग्रेसला विधेयकाविरोधात मतदान करायचे होते. तर ते झाल्यानंतर मंजुरीआधी जेडीएसला ते विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवायचे होते.
वाचा – महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांचा झेंडा काढण्याची वेळ या ठाकरे सरकारने आणली -निलेश राणे
धक्कादायक! राज्यात ११ महिन्यात १७३ बिबट्याचा मृत्यू…
शेतकरी आंदोलनाआडून एअरटेल व्होडाफोन लोकांना भडकवत आहे -जिओची तक्रार