गेली वर्षभर कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. या विषाणूमुळे लाखो लोकांना आपला जीवदेखील गमावावा लागला आहे. तर जगात पहिल्यांदाच आफ्रिका खंडातील इस्वाटिनी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कोरोना मुळे आपला जीव गमावला आहे.
आफ्रिका खंडातील इस्वाटिनी या देशाचे पंतप्रधान एम्बरोसे डालामिनी यांना कोरोनामुळे जीव गमववा लागला आहे. ५२ वर्षीय डालामिनी हे गेले महिनाभरापासून कोरोनाशी लढत होते. दक्षिण आफ्रिकेतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सूरु होता.
इस्वाटिनमध्ये राजेशाही व्यवस्था आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री उपचारादरम्यान डालामिनी यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची माहिती देण्याची सूचना राजपरीवाराकडून मिळाली आहे अशी माहिती इस्वाटिनीचे उपपंतप्रधान थेंबा मसुकु यांनी दिली.
एम्बरोसे डालामिनी यांना 1 डिसेंबर रोजी उपचारासाठी दक्षिण आफ्रिकेतील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. दरम्यान, इस्वाटिनी हा 12 लाख लोकसंख्या असलेला छोटासा देश आहे. या देशामध्ये आत्तापर्यंत एकूण 768 जणांना कोरोना झाला असून 127 जणांचा मृत्यू झाला आहे.